गुढी उभारू ऐक्याची
गुढी उभारू ऐक्याची
1 min
153
चैत्र मास तळपतो
करा बदल सांगतो,
दिन हे रखरखीत
वारा उष्म्यात रांगतो ॥१॥
हिन्दू नववर्ष सुरू
भरे उत्साह अपार,
गतकाळ कोविडचा
जन वाहे कष्टभार ॥२॥
ऐकमेका देऊ हाथ
साह्य करूया आर्थिक,
जर असेल धनिक
धन्य तो परमार्थिक ॥३॥
स्तोम माजले जातीचे
गती खुंटे विकासाची,
सम समान आनंदे
गुढी उभारू ऐक्याची ॥४॥
बळी जाती आज्ञानाने
जगी थारा न दे कुणी,
गुढी उभारू ज्ञानाची
सावित्रीच्या राहू ऋणी ॥५॥
संस्काराचे बीज लावू
संस्कृतीची करू रक्षा,
गुढी नरी सुरक्षेची
वासनांधा करू शिक्षा ॥६॥
