नव चैतन्य
नव चैतन्य
1 min
174
हिरवे कंच रान पाचूचे
पडले त्यावर रविबिंब,
नव यौवन रूप धरेचे
श्रावण झेलून अंग चिंब॥१॥
हळद माखली नववधू
लख्ख तेजाळल्या दाहीदिशा,
कंचन काया बहरली गे
साजन भेटी पल्लवी अशा॥२॥
चुडा हिरवा भरा तिजला
लोलक तरु शाखा सुमन,
कलवर्या सजल्या सगळ्या
छेडत तिज लाजले मन॥॥३॥
जगी अप्रतिम अनुरागी
नयन रम्य मिलन सोहळा,
मेघ गर्जत सूर चौघडा
चैतन्य भरे सृष्टी मेळा॥
