कर्णबधिर
कर्णबधिर
1 min
107
शिस्तीत पाळून घेतलं
भगव्या कमळांनी मौन,
“श्री” चरणी वाहिले सारे
खरेच ते होते का गौण?।।१।।
रणरणत्या उन्हामध्ये
जळाल्या काय संवेदना,
निज स्वार्थ लालसेपोटी
दिखाव्याच्या सहवेदना।।२।।
अहंकाराच्या भडक्यात
शर प्रतिशोध भिडला,
शक्ति दर्शनच्या झोकात
हाती आपघात घडला।।३।।
अर्ध शताधिकांची होळी
नैतिकता कुठे गहाण,
अक्रोशाची जू न रेंगती
कर्णबधिर की पाषाण?।।४।।
नुकसानाची भरपाई
कुटूंबास मोबदल्यात,
माणूसच का देत नाही
मग माणसाच्या बदल्यात?।।५।।
