STORYMIRROR

Rakhee Bihani

Others

3  

Rakhee Bihani

Others

कृष्णसखी

कृष्णसखी

1 min
179

नणंद भावजय

कि जावा जावा,

कि बहिणीचा

वाटावा का हेवा॥१॥


नाही गं! या तर

जिवलग मैत्रीणी,

जणु कृष्णसखी

राधा रुक्मिण॥२॥


दिलखुलास की

मनमोकळ्या,

रंगल्या दोही

मनीच्या पाकळ्या॥३॥


नवपरिणीता

प्रथम भेटल्या,

पदर उकलत

रातीच्या हसल्या॥४॥


मुख उजळले

नाव येता ओठी,

भाव लपवता

नयनी लज्जा दाटी॥५॥


Rate this content
Log in