STORYMIRROR

Rakhee Bihani

Others

3  

Rakhee Bihani

Others

सासर हे सासरंच असतं

सासर हे सासरंच असतं

1 min
173

मी म्हणते, माहेर हे माहेरच असतं

तसं...

सासर हे सासरच असतं...

नाहीतर, आपल्याला जगणं म्हणजे काय,

हे कसं आणि कधी कळलं असतं ?...


संस्कारांची पायाभरणी माहेरात होते, पण;

रितीरीवांचा कळस सासरंच असतं,

शिकवण माहेरी मिळते, ( हे कर, ते नको करू,

वाद घालु नको, मोठ्याने बोलू नको)

पण अनुभव समृद्ध सासर करतं.. 

म्हणून म्हणते सासर हे सासरच असतं...॥१॥


नजर झुकती ठेवावी, ओठ शिवावे, हे माहेर शिकवत, 

पण

उघड्या नजरेने, प्रसंगी कठोर बोल वापरून, 

जगरहाटी ओळखायला सासर शिकवतं, 

म्हणून म्हणते 

सासर हे सासरच असतं...॥२॥


सासरी प्रेम जरी लेकीचं मिळत असले तरी

(हल्ली तर खुपच जास्त) ..

जबाबदाऱ्या व जीणं मात्र सुनेचच राहत असतं...

म्हणूनच म्हणते सासर हे सासरचं असतं...॥३॥


शिकवणूकीवर विश्वास ठेवून सासरी जाऊया,

कासऱ्याऐवजी आसरा बनुया,

सयांनो, आसऱ्यास आसरा मिळाला तरचं 

संसाराची बाग फुलते नाहीतर .....काय असतं ?

म्हणूनच म्हणते सासर हे सासरच असतं...॥४॥


माहेरीच होते सासरच्या कर्तव्याची जाण, 

पण, त्यासवेच्या स्वप्नरंजन चंदेरी विश्वातल्या

जबाबदाऱ्यांचे ओझे पेलायला सासर शिकवतं॥५॥

म्हणूच म्हणते, सासर हे सासरच असतं...


हे ऐकून आईला जरा वाईटच वाटलं, म्हणाली...

वळण, संस्कार, विनम्रता, रागावर संयम,

 विविधआंगी बहरलेलं माझ्या दाराचं 

फलद्रुप होणारं रोपटं मी दान केलं....

ज्या भागात दिलं, तिथलं हवामान, तापमान,

वातावरण कशाचीही  माहिती नसताना, पर्वा न करता !!

अगदी बीजंकुरणापासुन सासरी जाईपर्यंत 

तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं नातं...


अन् आईचे डोळे पाणावले...

कष्ट माझे आणि श्रेय सासरला !!॥६॥


शेवटी मुलीचं आईला उत्तर...

आई ...तुझी सहनशीलता घेऊन आम्ही

सासरच्या दारात पाऊल ठेवलं गं, पण

या सहनशीलतेचा पल्ला गाठायचा कसा ? 

ते खरं कळलं सासरी !

म्हणूनच म्हणते, सासर हे सासरच असतं ....॥७॥


Rate this content
Log in