सामाजिक आशय
सामाजिक आशय
मनुष्याचा जन्म
आनंदे जगावा
सत्कारणी लावा
सन्मार्गाने
जीवनाचा दिवा
ज्ञानाने पेटवा
बुद्धीच्या ह्या नावा
तेजोमय
नका पाळू जाती
नको भेदाभेद
विवेकी विचारे
सद्बुद्धी
संसाराच्या गाठी
आनंदे सोडवा
ठेवा गोडवा
मांगल्याने
स्वाभिमानी जगा
नका गर्व करू
कष्टाची भाकरी
सुखावती
सत्य अहिंसेची
धरावी ही कास
सुख शांती ध्यास
अखंडित