स्त्री एक शक्ती
स्त्री एक शक्ती
जीवन अपूर्णच नारीविना
सर्वांगीण स्त्री एक शक्ती
तिच्या सामर्थ्याचा महिमा
होतसे जगभरातुन भक्ती
कन्या भगिनी सखी पत्नी
साकारतेय नानाविध रूप
प्रेम अन् वात्सल्याची मूर्ती
ठेवते कामात सदा हूरूप
लेकरांच्या सुखासाठी सदा
तडफडणारी अशी ही माय
नातवंडांची आजी बनताच
जपते जशी दुधावरची साय
पती परमेश्वराची अहर्निश
करी सेवा होऊन अर्धांगिनी
वाटूनी घेते सुखदुःखे तीच
आदर्श स्वामिनी सौदामिनी
संसाराच्या सुखासाठी नित्य
बनते कष्टाळू अष्टभुजाधारी
कोणाशी तुलना नाही जगी
एकमेव जगी अशी ती नारी
पाप्याचा करीतसे ती संहार
बनुनी ती महिषासुरमर्दिनी
साज शृंगार करूनि पतीची
सजविते शय्या ती कामिनी
