STORYMIRROR

Sandeep Dhakne

Inspirational

3  

Sandeep Dhakne

Inspirational

स्वप्न अधुरे

स्वप्न अधुरे

1 min
678

सारे सुखाचे सोबती

मागे आठवणी उरती

नाते जन्मांतरीचे

सुख दुःखात भेटती ।।


भेटती पुन्हा नव्याने

क्षण सारे आयुष्याचे

दिप उजळतो प्रेमाचा

नाते फुलते सुगंधाचे ।।


सुगंधाचे सुंदर फुल

सहवासात उमलले

स्पर्श आहे सोबतीला

हृदय तुझ्यात गुंतले ।।


गुंतले स्वप्न अधुरे

नाते नकळत तुटले

तुझ्या पाऊलखुणांचे

शब्द मजला भेटले ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational