स्विकार
स्विकार
तुझे नी माझे मागणे एकच
तुझ्या नी माझ्या नजरेत ओढ
तुझे नी माझे मन व्याकूळ
तुझ्या नी माझ्या अंगी शहारे
हात कापरा हाती देऊन
नजर मात्र घेतली चोरून
तुझे नी माझे सांगणे एकच
तुझ्या नी माझ्या मनी होकार
तुझे नी माझे ओठ निमुट
तुझा नी माझा चुकला ठोका
हसतेस लाजुन दूर होऊन
पाहतेस मज मान वळवून
तझे नी मझे मन गुंतते
तुझ्या नी माझ्या ह्रदयी कळ
तुझे नी माझे मन बावरे
तुझ्या नी माझ्या ह्रदयात धडधड
हवा हवासा हा गोड बंध
प्रेमात तु ही अन मी ही
तुझे नी माझे मुक बोलणे
तुझा नी माझा जीव अधीर
तुझे नी माझे शब्द गोठले
तुझा नी माझा श्वास थिजला
कळले तुला अन मलाही
श्वास श्वासास सांगून गेला
