स्वैर...!
स्वैर...!
स्वैर..स्वच्छंद....!
जीवन कसे असावे
याचे विचार नसावे
विचारांचे काहूर
डोक्यात नसावे...
स्वच्छ निर्मळ
मन असावे
शुद्ध सात्विक
विचार असावे...
स्वैर मुक्त
वर्तन असावे
स्वच्छंद आंनदी
जीवन असावे...
बंधन जीवनास
कोणते नसावे
बंधनाचे
जीवन जगणे नसावे...
स्वतंत्र स्वाभिमानी
जगणे असावे
कारणं
स्वतंत्र्यच प्रत्येकाला...
हवे असते
आनंदासाठी
स्वातंत्र्यच उपयोगी पडते
थोडक्यात...
मोकळं चाकळ जीवन
हे खरं जीवन कवन
पत्ते असले जरी बावन्न
जोकरच सदा असतो
नंबर वन....!
