STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Abstract Tragedy

3  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Abstract Tragedy

स्वातंत्र्याची हवी प्रचिती

स्वातंत्र्याची हवी प्रचिती

2 mins
325

स्त्री भ्रूणाला, जन्माआधीच हत्येची भीती,

जन्मानंतर तिने, चूल मुलचं करावे किती?

मुलगी म्हणजे, असते का फक्त अतिथी?

हेच बिंबवती सारे, सदा सर्वांच्या चित्ती!


जाता नाही ती, असते म्हणतात "जाती",

अजूनही म्हणतात, "ठेवा दूर चार हाती",

संधी रोजगारांच्या, कोसो दूर ठेवती ;

फुका म्हणती, "जाती साठी खावी माती"!


सेन्सेक्स ने पार केली साठ हजारी,

धनिकांचीच भरली, पुन्हा हो तिजोरी;

गरीबांच्या नशिबी, राहणे कर्जबाजारी,

नाही कोणास चाकरी, कोणास भाकरी!


वेळेवर, कधी अवकाळी पाऊस पडला,

तरीही थोडेबहुत पीक हाती देऊन गेला;

अस्मानी - सुलतानी माऱ्यामुळे,भाव पडला;

हातातोंडाशी आलेला, घास पुन्हा हिरावला!


कशी करावी चाकरी? कशी करावी शेती?

कशी जपावी नाती? कशी जाळावी जाती?

सरून तम अज्ञानाचा, अंधश्रध्देची होऊदे माती;

प्रज्वलित होऊदे पुन्हा, तळागाळात ज्ञान ज्योती!


उदयाला येऊ दे पहाट समानतेची नवी ती

मिटू देत विषमतेची दरी, हात घेऊनी हाती

नकोत फक्त वर्षे, अमृत महोत्सवाची ती;

खरोखरीच्या 'त्या' स्वातंत्र्याची हवी प्रचिती!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract