STORYMIRROR

Supriya Devkar

Tragedy

3  

Supriya Devkar

Tragedy

स्वातंत्र्याची देवी

स्वातंत्र्याची देवी

1 min
36

मी स्वातंत्र्याची देवी 

मीच विनविते तुुम्हाला 

मुक्त करा मज या पाशातून

स्वातंत्र्य माझे द्या मला

घडतो येथे रोज बलात्कार 

पुसला जातो मानवतेस काळीमा

इथे माणसानेच माणसाची 

बिघडवली आहे प्रतिमा 

दिवसाढवळ्या होतात हल्ले

पोळले जातात चेहरे  

हिरकणीच्या सुद्धा मनात  

मग भरून येते कापरे 

कसले स्वातंत्र्य उपभोगावे

जेव्हा घरातील माय खाते मार

दारूच्या नशेत होतात जेव्हा 

सपासप तिच्यावर वार

 आमची संस्कृती सांगते 

स्त्रियांचा करावा आदर 

बुरसटलेल्या विचारांची

सरकवेल का कुणी चादर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy