STORYMIRROR

Satish Wadekar

Inspirational

3.3  

Satish Wadekar

Inspirational

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य

1 min
28.8K



सूत्रहीन पतंग फिरे नभात

का असेल स्वातंत्र्याचे गीत गात

उन्मुक्तता ती कारण पतनास

बंधने नसता स्वातंत्र्याचा नाश


विचार करा स्वातंत्र्य जपताना

अन्याय न हो, स्वहीत करताना

स्वस्वातंत्र्य न हो इतरांचा काळ

परक्लेश हो, ती अभिव्यक्ती टाळ


स्वातंत्र्य घ्या परहीत करताना

दीन दुबळ्यांची झोळी भरताना

क्षुधाग्रस्त जो आहे कोसळण्यात

स्वातंत्र्य घ्या त्यांना तृप्त करण्यात



स्वातंत्र्याहून महान मानवता

हाच मंत्र सदैव मनी जाणता

मर्यादेत स्वातंत्र्याचा लाभ घ्यावा

स्वातंत्र्यासही पिंजरा असू द्यावा



स्वातंत्र्यास कर्तव्याच्या तुरुंगात

ठेऊनी करा उन्मादावर मात

यातच वसे मानवतेचे हीत

असे स्वातंत्र्याची हीच खरी रीत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational