स्वातंत्र्य दिन
स्वातंत्र्य दिन
तिरंगी झेंडा हाती धरू या
वीर जवानांचे बलिदान स्मरू या
बलिदानाची यशोगाथा वाचू या
बालकांना त्यांची प्रेरणा देऊ या
अनेक समस्या आपण उलगडू या
बालमनास आपण पटवून देऊ या
नव संशोधनास चेतना जागवू या
बुद्धिकौशल्य पणास लाऊ या
देशविकासाला हातभार लाऊ या
मंत्र विकासाचा बालमनास देऊ या
कार्य क्रांतीकारकांचे सांगू या
रक्तरंजित क्रांतीचे स्मरण करू या
बेडी अधोगतीची आपण तोडू या
विकासात्मक पाऊले सर्व टाकू या
न्याय, समता, बंधूता पाळू या
भारत देशाला बळकटी देऊ या
इतिहास सत्याचा आपण शिकू या
देश सुपुत्रांचे आदर्श विचार वाचू या
त्यांच्या देशकार्यातून प्रेरणा घेऊ या
सांडलेल्या रक्तातून क्रांती घडवू या
अन्याय, अत्याचाराचा विरोध करू या
देश विघातक शक्तीला धडा शिकवू या
माणसाला माणूस समजू या
पशूसमान वागणूक त्यास न देऊ या
स्वातंत्र्य दिनाला शपथ घेऊ या
सार्वभौम भारत एकता टिकवू या
हक्क, कर्तव्ये समजून घेऊ या
सुसंस्कृत, साक्षर भारत घडवू या
जाती, धर्म, पंथ, आदर राखू या
शांतीचा संदेश सर्वांस देऊ या
अखंड भारताचे स्वप्न साकार करू या
बालमनाला ताकदवान शिक्षण देऊ या
