स्वामीभक्त
स्वामीभक्त
वाचताना वाटत होत, आपणही तिथेच आहोत.
हीच परिस्थीती कायमची, उघड्या डोळ्या समोर राहोत.
सुरवात केली वाचायला, तसा प्रवास सुरू झाला होता.
कित्येकदा वाचूनही तेच पुस्तक, मनाचा हावरेपणा संपत नव्हता.
रणजित देसाईंनी लेखणीतून, असे काही स्वामी उभा केले आमच्यासमोर.
एक एक पान वाचताना, चक्क इतिहासच यायचा नजरेसमोर.
भाषा शब्द आणी मांडणीच्या जोरावर, सर्वोत्कृष्ट ची व्याख्या दाखवली.
असे काही लिहून गेलात की, प्रत्येक ओळ कायमची मनात राहून गेली.
लेखकांचे शब्द बोलतात, तुम्ही पलीकडे करून दाखवले.
शब्दांचे जगणेपण दाखऊन, सरस स्वामी उभा केले.
