सूर्यदर्शन
सूर्यदर्शन
सूर्यदर्शनाने नभी वसंत फुलला,
सप्तरंगाची उधळण्यात दंगला.
नवचैतन्याची करत पखरण
चराचरीत आनंद परीमळला.
अमृत प्याला घेऊन अवतरला,
सूर्यदर्शन देण्या व्याकूळ झाला.
क्षणभंगुर जीवन सार ज्यास कळला,
मोहमाया विसरत जीवन तोच जगला.
सोनसकाळी सुर्याची कृपादृष्टी.
हिरवळीवर अवतरे मोत्यांची सृष्टी.
प्रसन्नतेने बहरले सारे कष्टी.
विधात्याची आम्हावर असते दृष्टी.
