सूर्य व्हावे
सूर्य व्हावे
सूर्य व्हावे
पहिल्या पावसाने
सुगंधित होते माती
शाळेच्या प्रागंणात
भेटतात नवी नाती ।।
शुद्ध संस्काराचे बीज
कोवळ्या मनात पेरावे
आयुष्याच्या पटलावर
स्वप्न उदयाचे उगावे ।।
क्षितिजापार ध्येयाने
उंच भरारी घ्यावी
शाळेत विदयाथ्र्यानां
नित्य प्रेरणा भेटावी ।।
निरागस शब्दांना
पुन्हा पालवी फुटावी
जग जिंकण्यासाठी
इथेच माणसे घडावी ।।
इवल्याशा पाखरांच्या
पंखात बळ भरावे
अंधार दूर करायला
शिक्षकाने सूर्य व्हावे ।।
