सुटतो मानाचा ताबा..
सुटतो मानाचा ताबा..
तुझ्या भावनांचं ओझं
का होत माझ्या पापणीत..
ओसरती किरणांची उन्ह
का सलते माझ्या मनात...
या ही उपर तू छळतोस
पावसा मज असा काही ...
येतो न येतो श्रावण तोच
आसवांची सर ओझरते नयनात ..
जरा जराशी मनाच्या धुंदीत
बेधुंद हवा ही तुझी दिवानी मज करत
घातल्या ज्या बेड्या या मनास
सुटू पाहे ते बंधनाचे पाश ना भावतात
येता सागर लहरी उठवती रान
.. अखेर सुटतो ताबा मानीचा तो
पाहता तुज हरते मन पुन्हा
तहास काट देतं हे मन क्षणात
तुझ्या वचनात जगते प्रिती पुन्हा
ओझरते स्वप्न होते मनीची दुखरी सल उगाच
सोबतीस होते क्षण साक्षीला
विरतो तो भाव असा या विरहात
आसवांची सर ओझरते नयनात ..

