सुरेल साथ
सुरेल साथ
मंदिराच्या गाभाऱ्यात ,
मंद तेवत एक वात होती,
मंद मंद प्रकाशाची,
जणु सुरेल साथ होती...
पवित्र त्या वातावरणात,
शांत चित्ताने ऐका,
ऐकु येईल संगीताची धुन ,
जी अंतरंगात गात होती ...
मन मंदिराच्या प्रवेशद्वारी ,
तिची होता भेट ,
जणु झंकारून विणा,
सप्तसुर गात होती...
दाटले आभाळात पाणी,
सरींची झाली रिमझीम,
बरसता काळ्या मातीत,
गोड ताल धरत होती ...
चराचरांत संगीत ,
मन असो की तन,
एकजीव होऊन ,
विसरून स्वतःला जात होती...
