STORYMIRROR

Sunil Deokule

Fantasy

2  

Sunil Deokule

Fantasy

सुखद स्वप्न

सुखद स्वप्न

1 min
2.7K


तीची व माझी झाली पहिली भेट

मग गेलो आम्ही सिनेमाला थेट

तीला व मला मी पडद्यावर पहातो

मग मात्र सिनेमा खुप एन्जाॅय करतो

मध्यंतरात एकच आईस्किम आणतो

ते ही एकाच चमचाने हळू हळू खातो

सिनेमा संपेपर्यंत खुप रोमान्स करतो

कधी हसतो, कधी रडतो, कधी फाईट करतो

ती जवळ आल्यावर हिरोईनचा भास होतो

मग मात्र मी एक प्रेम गीत गातो

मनातला सर्व राग खलनायकावर काढतो

प्रेम मात्र फक्त तिच्यावरच करतो

तिच्या माझ्या संसाराची स्वप्न पाहून घेतो

तेव्हा हळूच तीला मी मिठीतही घेतो

नको नको म्हणताना I love u म्हणतो

हळूवारपणे ओठांचे चुंबनही घेतो

कहानी दोघांची थोडी पुढे नेतो

दोघे मग विरघळून एक होऊन जातो

त्यावेळी सीट मधला हॅन्डलही खुपतो

तो आकाराने मग एक फुटाचा वाटतो

आयुष्यात असा ही क्षण येऊन जातो

क्षण तिथेच थिजावा आपल्यास वाटतो

खुप त्रास भोगत आयुष्य जगत असतो

सुखाचा क्षण असा कधी वाट्यास येतो

शेवटी एकदाचा मग मी खलनायकास पिटतो

चुकून त्याचा ठोसा माझ्या गालाला लागतो

ओरडून मी म्हणतो "थांब तुला पहातो!"

बायको म्हणते "झोपतोस की कामावर जातोस?"

तेव्हा स्वप्नातून मी खाड्कन जागा होतो

घाण्याच्या बैलासारखा कामाला लागतो

कधी तरी स्वप्न माझे पुरे होऊ दे

बायको सारखीच प्रेमळ प्रेयसी मिळू दे

खरोखरी नसली तरी स्वप्नात मिळू दे

स्वप्नेही माझी सारी सुखकर होऊ दे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy