सुखांच्या फुलांची माळ
सुखांच्या फुलांची माळ
पुन्हा एकदा असे थांबलो, अडकून पडलो आता.
वागणुकीने इथवर आलो, पुऱ्या झाल्या त्या बाता.
ऐकतो वाचतो बोलतो, सगळंच ते चांगलं.
एकदा वेळ मेली की, वाटलं आता भागलं.
भागलं ते नव्हतं, शत्रू अंदाज घेत होता.
आपणंच गाफील राहिलो, बुद्धीचा अहंकार खोटा.
नव्यानं सार उभं राहिलं, पुन्हा तेच संकट.
या वेळी हरलो तर, संपेल सगळं सरसकट.
संयम आहे आपल्याकडे, फक्त थोडी शिस्त पाळायचीय.
पुन्हा नव्या सुखांच्या फुलांची, माळ आपल्याला माळायचीय.
