सुख दुःख
सुख दुःख
सुखाच्या सरी जेव्हा आनंद घेऊन येतात
तेव्हा दुःखाच्या लाटा दूर पळून जातात......
सुखाची सावली जेव्हा आधार देऊन जाते
तेव्हा दुःखाचं रख- रखत ऊन शांत होऊन जातं.........
सुखाचा गुलाब जेव्हा उमलू लागतो
तेव्हा दुःखाच्या काट्यांकडे दुर्लक्ष होतं .........
सुखाचा घंटानाद जेव्हा जीवनात होतो
तेव्हा दुःखाचं सावट अदृश्य होतं .........
सुखाचा सप्तरंगी इंद्रधनु जेव्हा दिसू
लागतो तेव्हा, दुःखाचे काळे ढग दडून जातात.......
असा हा सुखदुःखाचा खेळ जीवनात कायम सुरू असतो,
जीवन असेपर्यंत अंत त्याला नसतो....
