सुगंध
सुगंध
ज्या वासाने वातावरण बहरले
त्याच्यासाठीच तिला राखेत तोलले
तिच्या सुगंधात हलके वाटते
तीच सर्वांसाठी शेवटपर्यंत टिकते
तग धरून राहते सुखासाठी
तिच्यासाठी उरते छोटी काठी
रोज मनास ठेवी ताजीतवान
तोडून करी तिला लहान
रोजच्या आयुष्यात पाहिजे खरी
एकेक करत जळते बिचारी
