STORYMIRROR

yuvaraj jagtap

Tragedy

3.5  

yuvaraj jagtap

Tragedy

सत्तेसाठी सर्व काही (कविता)

सत्तेसाठी सर्व काही (कविता)

1 min
580


सत्तेसाठी सर्व काही


चार टाळकी मागे जमली की

आमदार झाल्या वाणी वाटतंय

मग मिळविण्यासाठी तिकीट

वरिष्ठांच्या खेटराला ही चाटतंय


खोटे बोलून लाळ घोटाळून

निवडणुनिकीच तिकीट मिळवतंय

सत्तेसाठी सर्व काही म्हणत

बहूमतासाठी सदस्यांना पळवतंय


दादागिरी व पैशाच्या जोरावर

मतदानात मतं ही मिळावतंय

बहुमताचा चांगला डाव साधून

कुरघोडीत ही विरोधकांची जिरवतंय


नुसता विकासाचा बोलबाला

आश्वासनांची गाजरं दाखवतंय

मी दिनरात तुमच्या विकासासाठी

झटल्याचं दुनियेस फक्त भासवतंय


सत्तेचा उपभोग स्वतःसाठी मस्त

धूम धडाक्यात करून घेतंय

देशीवर रोज ताव मारणारा पट्ट्या

रात्रंदिवस फक्त विदेशीच पेतंय


गावोगावी दोन गट पाडून

गाव सारं राजकारणांनी पेटवतंय

मताच्या भिकेसाठी सगळी भांडणं

स्वतः जातीनं जाऊन मिटवतंय


दर पंचवार्षिक ला सपशेल

मतदारांच्या पायावर लोळतंय

येता निवडून रंग आपलं बदलतंय

हे सारं सारं सत्तेसाठीच करतंय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy