STORYMIRROR

Anjali Bhalshankar

Abstract Action

2  

Anjali Bhalshankar

Abstract Action

सत्तेचा माज, खुर्चीचा हव्यास

सत्तेचा माज, खुर्चीचा हव्यास

1 min
83

  • काय हाटील, काय डोंगार, काय झाडी.काय माज किती हव्यास इतकी लबाडी!!.काय मतदार शेपाचशेला लाचार पुढे करोडो खायला नेता तयार.आता हतबल हैराण जनता सारी. मतांची भीक घालुन निवडले पुढारी लोकांच्या पैशावर मदार सारी लोकप्रतिनिधीं सेवक झालाय भारी लोकशाहीला गाडण्याची सुरू आहे तयारी
  • काय झाडी काय डोंगार काय हाटील लाचार सरकार जोरात आमदार भोळा सी एम राहीला गाफील.कोटयावधींचा बोभाटा झाला.आमदारांचा सेल लागला टोकनावर टोकन आले.एकेक करून सारीच निसटली
  • काय हाटील काय झाडी काय डोंगार.माणुस झालाय इतका भंगार?मातीच होणार एक दिवस तरीही नीच वृत्तीचा स्वार्थी षडयंत्री कारभार.न्यायालय ही कसली बेकार पुढारयांसाठी चोवीस तास तयारी कुठे आहेत सामान्यांचे न्याय अधिकार. साराच षंढाचा बाजार. जो तो आपलेच घर भरणार. काॅमन मॅन असाच जगणार?खरच!काॅमन मॅन भाकरीच्या संघर्षासह मरणार!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract