STORYMIRROR

Rohit Khamkar

Fantasy Thriller

2  

Rohit Khamkar

Fantasy Thriller

सत्तांतर

सत्तांतर

1 min
59

रोज बदलतो रंग आम्ही, विचारांची झालर लाऊनी.

दाखवतो असे काय ते, लोकशाहीच गाणं गाऊनी.


धरले वेठीस तुम्ही, सारे असे मिळुनी.

धागा दोरा असा पकडला, टाकले सारे पिळूनी.

सोबत तुमची धरली आता, निष्ठा सारी गिळूनी.

दाखवतो असे काय ते, लोकशाहीच गाणं गाऊनी.


कधी वाटते असे, तुम्ही ही केली होती जुळवनी.

कधी न जमणारी, मिळाली होती मिळवणी.

बंडाळी लागली अशी ती, फुटली सारी गुळवनी.

दाखवतो असे काय ते, लोकशाहीच गाणं गाऊनी.


सारं काय ते जानतेसाठी, असेच सारे वगुणी.

न्याय ध्येय अनं तत्व, सारे काय ते घेऊनी.

परी सत्य असे ते, प्रवास सारुणी.

दाखवतो असे काय ते, लोकशाहीच गाणं गाऊनी.


सरते शेवटी बदल व्हावे, सारं काय ते होऊनी.

बाजू घ्या मतदारांची, जातील सारे आनंद न्हाऊनी.

आकडा शेवटी महान ठरला, सत्तांतराचे महत्व जाणूनी.

दाखवतो असे काय ते, लोकशाहीच गाणं गाऊनी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy