सतत पैशामागे धावता
सतत पैशामागे धावता
कोणासाठी व्याकुळ तुम्ही
कोणाला जीव लावता
माणूस हा राहतो सतत
पैशामागे धावता || 0 ||
सर्व सत्तेचे पुजारी असतात
राजेशाही आणि
लोकशाहीत
पैशावर डोळा असता मग
आपलीच आपल्याला
ओळखत नाहीत
कोणावर प्रेम करता तुम्ही
कोणाच्या हृदयी मावता
माणूस हा राहतो सतत
पैशामागे धावता || 1 ||
