स्त्री मन जपताना
स्त्री मन जपताना
नाजूक कोमल चंचल
असा स्वभाव नारीचा!!
जपाव्या तिच्या भावना
वाटा होईल खारीचा!!
असते तीलाही मन
तिच्या ठायी वेदना!!
किती सहन करते
नको तिची वल्गना!!
संसाररूपी गाडा
चालविते स्त्री सतत!!
पाठ थोपटावी तिची
प्रत्येक क्षणी हरवक्त!!
हवी तिलाही एक फुंकर
विश्वासाची आणि कौतुकाची!!
भरभरून प्रेम देई
मुर्ती अशी मांगल्याची!!
हळुवार कोमल प्रेमळ
अशी सर्वांची जननी!!
जपावे तिजला प्रेमाने
प्रत्येकाने जन्मोजन्मी
