STORYMIRROR

Kalpana Deshmukh

Tragedy

3  

Kalpana Deshmukh

Tragedy

स्त्री दु:खाच्या कळा

स्त्री दु:खाच्या कळा

1 min
233

पितृसत्ताक समाजाने स्त्रीला

कायम दुय्यम स्थानी मानले

तिचा स्वभाव, अधिकार, कर्तव्ये

सारे रितीरिवाजाने निश्चित केले ।।


संकटांची चाहूल ओळखून

तजवीज तिच ठेवते करून

सहानुभूतीचे दोन शब्दही

पळ काढतात नजरे आडून ।।


साहूनिया ऊब अन् दाहकता

अंतर्बाह्य वेदनांच्या झळा

पाषाणहृदयी दुनियेस कळेल का?

स्त्री दु:खाच्या प्रसव कळा  ।।


सारेच क्षेत्रे पादाक्रांत करूनी

स्वबळाने अस्तित्व सिद्ध केले

तरी तिच्यातील उणीवा काढून

सुज्ञ मानवाने मागेच खेचले ।।


काळ कितीही बदलला तरी

ती आई,पत्नी,बहीण,माता रहाणार

या सर्व नात्यांच्या जोखडातून

ती कधी न मुक्तपणे जगणार ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy