STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

सर्वधर्मसमभाव

सर्वधर्मसमभाव

1 min
230

पतेती सण हा पारशी बांधवांचा 

फरवर्दिनाने नूतन वर्षाचा आरंभ 

करून अग्नीची पूजा 

करे साजरा नवरोज शुभारंभ


इस्लामी नववर्षाची सुरुवात 

होते पवित्र मोहरम महिन्याने 

करबला च्या युद्धाच्या आठवणीत 

करूया वंदन शहिदांना मनोभावनेने

          

उत्साहाने सजलेले ओनम 

उत्सव केरळ वासीयांचा 

पुष्प शोभा साजरी घरोघरी 

सण हा महाबली च्या आठवणींचा


मंगळागौरी सण स्त्रियांचा 

झिम्मा फुगडी आनंद निखळ 

श्रावणातला उत्साही सण

नवचैतन्य घरोघरी अवखळ


असले जरी धर्म वेगळे 

शिकवण आहे एकच मात्र 

सर्वधर्मसमभाव भावना 

करूया आनंदाने साजरे एकत्र


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational