STORYMIRROR

Rohit Khamkar

Abstract

4  

Rohit Khamkar

Abstract

सरकार

सरकार

1 min
153

स्थिर सरकार देण्यासाठी, पक्ष सगळे अस्थिर झालेले पाहिलेत.

सेवा करण्यासाठी का होईना, नेते इकडे तिकडे सुसाट पळत आहेत.


पाळणाऱ्या सत्तेला आता, आमदारांची घाई.

दिल्ली च्या तख्तासाठी, पुन्हा पेटली आहे बाई.


सगळ्यांनाच पाहिजे इथे, मान पान आणी खुर्ची.

लोकांच काय विसरून सगळ, पाहत बसतील परश्या आर्ची.


जनतेच्या हितासाठी, दावे आम्ही मांडले.

समंज्यस राजकारनी, तोडगे फटक्यात सांडले.


मी चांगला आणी मीच चांगला, हेच चालू आहे सुरवातीपासून.

तुमच्या वर्चस्वाच ठीक आहे, आमची काम मात्र घासून घासून.


निर्णय तुमचे बदलतात, कारणही दाखवता.

तुमच्या खेचा खेचित, जनतेला दुखवटा.


शेतकरी आमचा, कधी पर्यंत असाच मरणार.

खडबडून उठून कधी, वाचवायला येणार सरकार.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract