सरीता
सरीता
संथ वाहणारी ती सरीता
सामावून घेते सारे पापकर्म
तृष्णा भागवणारी माय ती
ओळखा तिच्या अंतरीचे मर्म....०१
कारखाने आणि प्रदूषणाने
दूषित झाले निर्मळ जल
आज अचानक तुफान येता
सरितेच्या गाभाऱ्यात चलविचल...०२
धो-धो येणाऱ्या पावसामुळे
स्थिती उद्भवते महापूराची
ओथंबून वाहती जलाशय
गर्जना होते हाहाकाराची...०३
सैरवैर पाणी तटाबाहेर
उद्रेक सरीतेचा भयानक
शेतशिवार जमीनदोस्त
घरे बुडाली अचानक...०४
सरीतेच्या तीव्र उद्रेकाने
मंदिर देवालय बुडते
पलटून जाती नाव,जहाज
सारे काही विपरीत घडते..०५
जनजीवन विस्कळीत सारे
उद्ध्वस्त केले संसार किती
भयानक रौद्र रूप सरीतेचे
पाहुनिया वाटते भीती...०६
