सरी
सरी
धरतीच्या उरावर पावसाच्या सरी,
मातीतल्या धुळीवर चिखलाची बारी
उन्हाची सांगता गारवा दारी
पुराला आडोसा नदीच्या घरी
शेतात होतील पेरण्या जरी,
शेतीला तारतोय पाऊस हरी
जिकडे तिकडे पाणीच पाणी
राज्याच्या गोष्टीत हसते राणी
चातका सारखी बघते वाट,
मनाचा कानोसा गाणी गात..
