स्री
स्री
आत्मनिर्भर होण्यासाठी
ती घराबाहेर पडली
समाजात वावरताना
"स्त्री" म्हणून नडली
कोणी म्हणे दुबळी
कोणी म्हणे लाचार
हसली ती मनाशीचं
पाहून हे विचार
तिने ठरवले उडायचे
उंच उंच आकाशी
सिद्ध करायचे स्वतः ला
झगडून संकटाशी
खूप खूप अडचणी
नाही ती थकली
नशीबाशी झगडून
नियतीला हसली
सर्वच क्षेत्रात तिने
केले यशस्वी पदार्पण
ठसा उमटवला स्वतः
ठरली दुसऱ्याची दर्पण
तीचं आत्मनिर्भर होणही
समाजाच्या पथ्यावर पडल
"घर "आणि "करियर" दोन्हीं
तीच रणांगण बनलं
त्या रणांगणातही ती
यशस्वी लढतच आहे
कुठेच कमी न पडता
स्वतःला सिध्द करतच आहे
