सर्दी आणि खोकला
सर्दी आणि खोकला
सर्दी आणि खोकला
वाटतो जीवघेणा
पावसात भिजल्याचा
आहे हा बहाणा।।
सर्दी आणि खोकला
येतात दोघे एकत्र
मला वाटते खरे
आहेत दोघेही मित्र।।
सर्दी आणि खोकला
झोपू देत नाही
खोकताना हळूच
नाक पुसण्याची घाई।।
सर्दी आणि खोकल्याची
पसरली आहे साथ
पावसात न भिजून
करूया त्यावर मात।।
