STORYMIRROR

Somesh Kulkarni

Inspirational

3  

Somesh Kulkarni

Inspirational

सरावा उमाळा असा अंतरीचा

सरावा उमाळा असा अंतरीचा

1 min
554


कशाला करु मी अतां अट्टहास

न वाटे मला सत्य हा फक्त भास

कळावा तुला ठाव माझ्या मनीचा

सरावा उमाळा असा अंतरीचा


देशील सखये मला हे वचन

नको अंतरु मज कदापि म्हणून

काहीच मजला नको बाकी साचा

सरावा उमाळा असा अंतरीचा


जाणून घे तू मला सर्वरूपी

मनाला अथांग तुझे नाव व्यापी

प्रेमास अपुल्या नसो काही वाचा

सरावा उमाळा असा अंतरीचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational