STORYMIRROR

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Romance

5.0  

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Romance

स्पर्श

स्पर्श

1 min
1.0K


जगतांना या महिन्यांत, उन्हामधे चिंबुन गेला

उन्हात तर्क एवढ्या, गारवा देऊन गेला

तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला

गालावरी तुझ्या का खुलवुन लाज गेला


होता जरा शहारा, वेडा हा खुळा बहाणा

ओठांवरी तुझ्या का, चढवुन साज गेला


संगीत शांत केले अंधार गात गेला

बेहोश रम्य राती उधळून श्‍वास गेला


भिजवुन अंग सारे विझवुन शब्द सारे

रंगात आज तुजला, रंगुन भास गेला...


तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला

गालावरी तुझ्या का खुलवून लाज गेला..


वावरत होतो एकटा, हा साथ तुझी देऊन गेला

तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला

गालावरी तुझ्या का खुलवुन लाज गेला.......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance