स्पर्धेसाठी
स्पर्धेसाठी
सरला काळ जुना,आले दिवस नवे
रुढी, परंपरा, चालीरिती गाडून,
विसरली संस्कृती अन्
संस्कारही गेले लयाला.
फॅशनच्या नावाखाली
उंचावले राहणीमान,
जिभेचे झाले चोचले,
नाष्ट्याच्या जागी ब्रेकफास्ट पोचले.
सण, जयंत्या उरल्या नावापुरत्या,
गेला एकोपा, आला मीपणा.
मतभेदाने तिरस्काराला आले बळ,
शेती, माती, गावाची तुटली नाळ.
आपुलकीचा आटला झरा,
माया, ममतेचा घोटला गळा,
नात्यांचा भरला बाजार
दुश्मनांचाच
वाढला शेजार.
करुन हानी निसर्गाची
वाढले जागतिकीकरण,
गाड्या,रस्ते आणि आभाळाला
भिडणा-या उंच इमारतीने
लागले वाढू प्रदुषण.
यांत्रिकीकरणाने कामे झाली सोपी ,
लाभल्या सुखसोयी हे खरंय,
पण बेरोजगारीला आला ऊत ,
अन् पैशाच्या हव्यासापोटी
पिसाटले गुन्हेगारीचे भूत.
महागाईच्या भस्मासुराने
स्पर्धेच्या जगात गरिबांना चिरडलं,
जीवाणू, विषाणूचे रोग पसरुन,
माणसाचं माणुसपणच भरडलं.