STORYMIRROR

Vinay Dandale

Tragedy

3  

Vinay Dandale

Tragedy

सपान ,,, 52 आठवडे स्पर्धा कवित

सपान ,,, 52 आठवडे स्पर्धा कवित

1 min
570

      

गर्भारल्या भूईकडे बघून ;

मन माझ हरखलं , 

बँकेच अन् सोसायटीच कर्ज फेडल्याचं ;

दिवास्वप्न मला पडू लागल ।। 


फुललेल शिवार हिरवेगार ; 

सोयाबीनचा बहर काढणीला आलेला , 

माझ्या स्वप्नांचा मळा ; 

तुरीवानी मोहरलेला ।। 


वस्तुस्थिती अशी की ....... 

भन्नाटला वारा 

अन् 

आल्या अवकाळी धारा ; 

सोबतीला त्यांच्या कैदाशिणी गारा , 

गर्भारलेल्या भुईचा हंबरडा शिवारी घुमला ; 

पिकांचा रगडा होऊन 

स्वप्नांचा चिखल उरला ।। 


अस्मानी पिच्छा सोडतच नाही ; 

अन् 

सुल्तानी कधीही तारत नाही ,

पंचनाम्यात अडकली गारपीटची फाईल ; 

अन् 

सातबाऱ्यात पिकाची नोंदच नाही ।। 


सगळ्यांची देणं देता देता ; 

मरणही टाळता येत नाही , 

जमीन जुमला सार काही विकून ; 

एंड्रिन चा डबा घेण्याईतपत 

पैसेही उरत नाही ....!!!! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy