STORYMIRROR

Saishankar Parab

Romance

3  

Saishankar Parab

Romance

सॉरी ना यार

सॉरी ना यार

1 min
560

आल्हाददायी सांजवेळ ही

सुटे बेभान अवखळ वारा,

दर्याच्या उधाणलेल्या लाटा करी

ओला जणू हृदयाचा किनारा...


डोळे का तुझे लाजले

ओठही माझे हळुवारपणे 

गालातच हसले,

नजरेत तुझिया पाहता जग सारे

स्तब्ध होऊनी मन माझे मात्र

तुझ्यातच हरवले...


वेड्या मनाचे हरवणे

त्याने तुझे बोलणे मात्र दुर्लक्षित केले,

"लक्ष कुठंय तुझा?" असं म्हणत 

नाजुक तुझ्या हातांनी माझ्या खांद्यांना 

मात्र जोराचे फटकावले...


एकटक तुला पाहण्याचा

आभास हा सारा "सॉरी ना यार"

म्हणुनी वाऱ्यासारखा नाहीसा झाला,

चंद्रावानी साजरा मुखडा हा तुझा

माझ्यामुळे नकळतच अल्लडपणे

मात्र हिरमुसला...


हिरमुसल्या चेहऱ्यावरचे हास्य 

परत खुलवताना गुडघेही

जमिनीवर टेकले,

निःस्वार्थ आपल्या प्रेमाने 

पुन्हा मात्र तुझे मन जपले...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance