सोनं उगल उगल
सोनं उगल उगल
*सोनं उगलं उगलं,*
*पोटी धरणी माईच्या,*
*मोल मिळाले कष्टाचे,*
*गाळलेल्या हो घामाच्या.*
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
*कधी ऊन कधी वारा,*
*कधी पावसाच्या गारा,*
*कधी निसर्ग कोपतो,*
*तेव्हा खचतो बिचारा.*
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
*बळीराजा ताकतीने,*
*उभा ठाकतो शेतात,*
*करी संकटात मात,*
*पिके उगती डौलात.*
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
*सोनं उगलं उगलं,*
*मनी दाटे समाधान,*
*शेतकरी सुखावतो,*
*पीक सोन्याचं पाहून.*
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃