STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Abstract Others

3  

Dattatraygir Gosavi

Abstract Others

सोन सकाळ

सोन सकाळ

1 min
240

सोन सकाळी, सोन पिवळी

किरणे अंगी, ल्याली ग।

सारस बागी, गोर कोवळी

दान भुईचे, प्याली ग।।धृ।।


गाली गुलाल, भाळी कुंकूम

तारामती, झाली ग।।१।।


चाल चन्द्रांची, माळ सुर्याची

यशोमती, झाली ग।।२।।


नाडी सूर्याची, गाडी चन्द्रांची

आगीन गाडी, झाली ग।।३।।


आरस पाणी, नयन बाहुली

भाव काजळी, आली ग।।४।।


कर्णफुले ती, केसा झुलती

हृदयी घंटा, नांदी ग।।५।।


कळी कोमल, कानी गुंजन

प्रीत पाक, रांधी ग।।६।।


राधे राधे, कृष्ण कृष्ण

सोन सडा, शिंपी ग।।७।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract