सोन किरणे
सोन किरणे
* सोन किरणे *
सांजेला अंगणात आली
सोन किरणे उंबरठ्यावरी
सुगंधी रातराणी मोहरली
मखमली ह्या पदरावरी
चोहीकडे उधळला रंग
आज सोन पावलांनी..
इंद्रधनुष्य अवतरले
स्वप्न वेचिता नयनांनी..
मन भरून पहावीत
तळ्यातील दोन कमळे..
चंदनाची छाया पसरत
त्यावरती ऊन पिवळे...
तारूण्याची किनार अन्
ऊन गाते सुरेल गाणी..
ह्रदयाची स्पंदने साथीला
चालवीत जशी अनवाणी..
@ काव्यप्रतिभा
