माहेर
माहेर
1 min
7
माहेर
मेहंदीच्या हातावर
उमटली दाट नक्षी
माहेरच्या आठवांचा
उभा अंगणात पक्षी..
उभा अंगणात पक्षी
त्याला मोकळे आभाळ
परतून माहेराला
जाते मन किती काळ..
जाते मन किती काळ
सोयरीक साधण्यास
झोका जाई वरखाली
कसे सावरु मनास?
कसे सावरू मनास
दाटे मनी हूरहूर
पाखरांनो सांगा आता
लेक भेटाया आतूर
@ प्रतिभा
