श्री गणेश
श्री गणेश
पाहून तुझिया लोचनी
दाटून येते भक्ती..
लंबोदर गजानना
बुद्धी तूच शक्ती...
स्मरता तुज विघ्नेश्वरा
संकटातून मुक्ती..
दयाघना कृपावंता
वरदायकाची किर्ती..
द्यावी मज तुच
परामार्थ युक्ती..
तुजवीण न मज
होवो कशाची आसक्ती ..
@ काव्य प्रतिभा
