राधा
राधा
राधा..
तुझ्या असण्या नसण्याचा
सगळ्याचा सोहळा..
कृष्णा तुझ्या रंगात
रंग माझा वेगळा..
तुझ्या सहवासाची
छाया मजवरी
भावबंधनांचा दोर
राधा ही बावरी..
माझ्या अंतरंगाच्या
वाटेवरी तो स्थिर..
हृदयाची बासरी
वाजवितो गिरीधर....
तुच आदी अनंत
पूर्ण तत्व तूच कृष्णा..
अधुऱ्या राधेस तुजविण
कशाची न तृष्णा..
@ प्रतिभा
