चाफा
चाफा
चाफा
बंद मुठीतील चाफा
उलगडला जातो जेव्हा..
मन विरघळून जाते
तुझ्या आठवात तेव्हा..
सोन पिवळी कांती
हिरव्या बांगड्यांचा घेर..
हळदीच्या हाताने धरला
दोघांनी सप्त फेर..
कैद करून ठेवले
क्षण आनंदाचे सप्तरंगी..
तू मला बांधून घेतले
एका नजरेने कोमलांगी
दरवळला गंधाने हा
हातातला चाफा सोनेरी..
विरहात जळतो आहे
स्वप्न पाहतो रूपेरी..
@ काव्य प्रतिभा
