नियतीचा खेळ
नियतीचा खेळ
: नियतीचा खेळ
नियतीचा खेळ पहा
कधी कुणा कळला..
जीवनात प्रत्येकाचा
भोग नाही टळला..
मी चांगले वागतो
माझे वाईट घडले..
देवादिकांच्या पदरी ही
नियतीचे पाऊल पडते
फासे पडले कधी
उलटे आणि सुलटे..
जीवनाचा सारीपाट
वेदनांची रेघ उमटे...
स्वीकारावे पदरातले
जीवन क्षणभंगुर नश्वर
कर्म वाणीने संतोषी
पहावा क्षणोक्षणी ईश्वर
@ काव्य प्रतिभा
सौ. प्रतिभा महादेव चौगले
कोल्हापूर
