प्रति रूप माझे..
प्रति रूप माझे..
प्रतिरूप माझे..
शब्द न्यारेच आणि गंधीत वारे होते..
तू येताना जाताना वेगळे नजारे होते...
कुशीत घेता तुज श्वास निस्तब्ध झाला
अबोध मनाची भाषा नयनी पहारे होते...
निरंजनातील वात शांत तेवत होती
थिजल्या दोन क्षणांचे रिते गाभारे होते..
तू प्रेरणा या मनाची ,सुप्त परिभाषा
जन्मतच तुला कसे प्रतिभेचे निवारे होते..
लेखणीतून उतरलेले तू प्रतिरूप माझे
स्वप्न गहिरे मन लहरीत तुझेच इशारे होते...
@ काव्य प्रतिभा
प्रतिरूप माझे..
शब्द न्यारेच आणि गंधीत वारे होते..
तू येताना जाताना वेगळे नजारे होते...
कुशीत घेता तुज श्वास निस्तब्ध झाला
अबोध मनाची भाषा नयनी पहारे होते...
निरंजनातील वात शांत तेवत होती
थिजल्या दोन क्षणांचे रिते गाभारे होते..
तू प्रेरणा या मनाची ,सुप्त परिभाषा
जन्मतच तुला कसे प्रतिभेचे निवारे होते..
लेखणीतून उतरलेले तू प्रतिरूप माझे
स्वप्न गहिरे मन लहरीत तुझेच इशारे होते...
@ काव्य प्रतिभा
प्रतिभा महादेव चौगले
कोल्हापूर
