सोमवार सुप्रभात छान आहे...!
सोमवार सुप्रभात छान आहे...!
सोमवार सुप्रभात छान आहे....!
सो सले उन्हाचे चटके
म ज असाह्य जे जाहले
वा ताहात झाली उकाड्याने
र खरखत्या त्या उन्हाने
सु जलाम सुफलाम भूमाता
प्र सवत होती नित्य प्रसन्नता
भा ग्यात सदैव सौख्य होते
त नातही सदैव बळ होते
छा न छान दिवस सदैव उगवायचे
न व्हती कधीच कशाची वाणवा
आ ता मागे वळून पाहता
हे च नसण्याचे शल्य मनी साठते
पूर्व क्षितिजावर रविराची चाहूल लागता
आस मात्र अजूनही सुखाची लागते
थोडे थोडे तेज नभी फाकता
पुन्हा भाग्य ते मग दिसू लागते....!
सुप्रभात...!